रणगंधाचे गारुड – ना. धों. महानोर

375.00 300.00

Fiction

25 in stock

Category:

Ranagandhaache Garud

“आज लिखित पत्रांची संस्कृती जवळपास लोप पावण्याच्या अवस्थेत आलेली असताना आडबाजूच्या गावी राहणाऱ्या एका कवीला आलेली ही पत्रे पत्रांच्या केवळ संख्येच्याच दृष्टीने नव्हे तर ती धाडणाऱ्या व्यक्तींचे व विषयांचे वैविध्य याही दृष्टीने अगदी विस्मयजनक म्हणावीत अशीच आहेत….

या पत्रसंग्रहाला ‘रानगंधाचे गारूड’ हे शीर्षक अनेक अर्थांनी अन्वर्थक वाटते. शहरी सभ्यतेत वाढलेल्यांना अपरिचित असलेला रानगंधाचा दरवळ, त्याची अनवट उन्मादकता, अनोखा व अस्वस्थ करणारा, भुरळ पाडणारा व सर्वव्यापी असलेला परिमल या सगळ्या गोष्टी ध्यानात घेता रानगंध ही प्रतिमा ना. धों. महानोरांच्या व्यक्तिमत्त्वाशी एकदम सुसंवादीच ठरते.

अनेकांनी एका व्यक्तीशी केलेला संवाद असे या पत्रव्यवहाराचे स्वरूप असल्यामुळे त्यातील बहुतेक संदर्भ व्यक्तिकेंद्री असणे अगदीच स्वाभाविक असले तरीही अनुषंगाने त्यातून महाराष्ट्राच्या समकालीन परिस्थितीवरही प्रकाशझोत पडल्यावाचून राहत नाही. साहित्यकारण, प्रकाशन व्यवसाय, राजकारण, शेती व शेतकरी अशा बऱ्याच विषयांवरचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख अनेक पत्रांमधून झालेले दिसून येतात. व्यक्तिगत अनुभवांच्या माध्यमातून साकार झालेली ही भाष्ये असल्यामुळे त्यांचे स्वरूप विस्कळीत असले तरी ती वाचकांना विचारप्रवृत्त नक्कीच करतील. ”

– भास्कर लक्ष्मण भोळे

प्रस्तावनेमधून

ISBN: 978-81-7991-914-9

No. of Pages: 276

Year of Publication: 2008

Weight 0.3 kg
Dimensions 24.13 × 17.78 × 1.5 cm