Rangkamal (रंगकमल) – Kamal Desai (कमल देसाई)
कमल देसाई
‘रंगकमल’ हे पुस्तक म्हणजे कमल देसाई यांच्या असंग्रहित कथा आणि अप्रकाशित कवितांचा एक परिपूर्ण संच आहे. त्यांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासक आणि त्याच विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. प्रिया जामकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
डॉ. प्रिया जामकर यांच्या मते, एखाद्या चित्रकाराने आपल्या स्केचबुकमध्ये आधी नुसती स्केचेस करावीत आणि नंतर त्यांचं पेंटिंग करावं तसं कमल देसाईंच्या कविता आणि त्यांचं कथात्म साहित्य यांचं नातं आहे. पुस्तकाच्या संपादनासोबतच प्रिया जामकर यांनी कथा आणि कविता या दोन्ही विभागांना अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहिल्या आहेत.
या पुस्तकाच्या निमित्ताने कमल देसाई यांचे समग्र साहित्य वाचकांना आता उपलब्ध होत आहे.
ISBN: 978-81-955127-6-8
Number of pages: 240
Year of Publication: 2023