मेळा : दासू वैद्य

350.00 Original price was: ₹350.00.280.00Current price is: ₹280.00.

Non-Fiction

Mela (मेळा) – Dasoo Vaidya (दासू वैद्य)

दासू वैद्य यांचं ‘लोकसत्ता’मधलं ‘यमक आणि गमक’ हे सदर वाचकप्रिय झालं ते त्याच्या साहित्यिक मूल्यामुळेच. या सदराच्या निमित्ताने वर्षभर त्यांनी लिहिलेल्या लेखांचं ‘मेळा’ हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. खरंतर सादरलेखनाचा हा दासू वैद्य यांचा पहिलाच प्रयत्न. दर आठवड्याला ठराविक शब्दमर्यादेत लेखन करणं संवेदनशील कविमनाच्या वैद्यांना फारसं कठीण गेलं नाही. कवितेत परावर्तित न झालेले अनेकरंगी अनुभव गाठीशी होते, बालपणीच्या कडूगोड आठवणी होत्या आणि हे सारं शब्दांत मांडण्यासाठी आवश्यक असलेली काव्यमय शैली त्यांच्याजवळ होती. असं सारं जमून आल्यावर व्यक्त व्हायला आतुर असलेल्या अनुभवांना शब्दरूप मिळायला फारसा वेळ लागला नाही. वर्तमानपत्रातल्या लेखनाशी जेव्हा वाचकाची नाळ जुळते, वाचक लेखकाच्या अनुभवाशी, विचाराशी एकरूप होतो तेव्हाच सदरलेखन खऱ्या अर्थाने लोकप्रिय होते. अशी वाचकप्रियता वैद्य यांना ‘रंग’ या अगदी पहिल्या लेखापासून मिळाली. या संग्रहात गद्यकाव्य म्हणावेत असे तरल अनुभव देणारे लेख आहेत तसेच आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे वैचारिक लेखही आहेत. काही गमतीदार आठवणी सांगणारे तर काही वाचकाला अंतर्मुख करणारे लेख आहेत. सर्वांत महत्त्वाची आहेत ती दोन पत्रं, एक तामिळ लेखक पेरूमल मुरुगन यांना उद्देशून लिहिलेलं आणि दुसरं, नाटककार विजय तेंडुलकर यांना उद्देशून लिहिलेलं. म्हटलं तर दोन्ही पत्रांचा परस्परांशी काहीही संबंध नाही, म्हटलं तर आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा वाचकांनीच ती वाचून त्यांवर विचार करावा हेच अधिक योग्य.

ISBN: 978-81-7991-968-2

Number of pages: 162

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2024