मृदगंध : विंदा करंदीकर

225.00 Original price was: ₹225.00.180.00Current price is: ₹180.00.
Sold out

Out of stock

Category:

Mridgandha (मृदगंध) – Vinda Karandikar (विंदा करंदीकर)

विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य ह्यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते – अशा वेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य, तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते तर कधी कधी ‘लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकाची मिस्कील नजर ह्यांची एकदम किंवा एकामा एन एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवांतील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात जशी ती रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वर वर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते. ‘स्वेदगंगे’ नंतर अवतरणाऱ्या ह्या ‘मृद्गंधा’त तिची ही सर्व वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत.

ISBN: 978-81-7991-890-6

No. Of Pages: 140

Year Of Publication: 1954

Weight 190 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.8 cm