Muktayan (मुक्तायन) – Kusumagraj (कुसुमाग्रज)
‘अजून यौवनात’ असलेली कुसुमाग्रजांची प्रतिभा, तिचा हा नवा आविष्कार. शांत, संयत, अधिकच प्रसन्न, ‘मुक्ततेचे आश्वासन देणारे उन्हाचे कवडसे ‘शोधणारा हा कवी, जीवनातील पावित्र्याच्या, संतत्वाच्या आध्यात्मिक अनुभवात रमला आहे; पण त्याच वेळी जीवनातील विरूपता, दुःखदैन्य, अत्याचार, दारिद्र्य, दुष्टप्रवृत्ती यांमुळे अस्वस्थही झाला आहे.
त्यामुळेच, ‘पाणनिळ्या शब्दांच्या नितळ सरावेरात’, ‘देहूचा वाणी’ गवसल्याचा आनंद जसा या कवितांतून साजरा होतो तसाच ‘चंद्राचं चांदणं आमच्या वस्तीवर केव्हा पडतच नाही… सुंदराची साथ करणारा चंद्र आमच्या आकाशाला सततचाच अनोळखी’ असा उदासीन सूरही या कवितांतून वाहताना दिसतो.
ISBN: 978-81-7185-281-9
No. Of Pages: 156
Year Of Publication: 1984