मिडास : पद्मिनी बिनीवाले

12.00

Fiction

Category:

Midas (मिडास) – Padmini Biniwale (पद्मिनी बिनीवाले)

मिडास’ हा प‌द्मिनी बिनीवाले यांचा पहिलाच कवितासंग्रह. १९६० ते १९८० या वीस वर्षातील कविता या संग्रहात एकत्रित केल्या आहेत. ‘मिडास’ हा ग्रीक पुराणकथेतील सुवर्णप्रेमी राजा. प्रत्येक वस्तूला स्पर्श करून तिला सोन्याची करणारा. प‌द्मिनीबाईच्या कवितेतील मिडास म्हणजे ऊन आहे. हघा काव्यसंग्रहात अनेक ठिकाणी, अनेक रूपांत हे ऊन आपल्याला भेटतं कधी ते ‘उन्हाचं तुटुंब तळ’ बनतं; कधी ‘वसंतातली भोळी दुपार’ तर कधी ते ‘साच्या गावावरून वाहणारा प्रकाशपूर’ होतं. ऊन हे प‌द्मिनीबाईंच्या कवितंत चैतन्याचं, जीवनोत्साहाचं प्रतीक आहे. उन्हाच्या, प्रकाशाच्या रूपानं है चैतन्यच उमलतं आाणि बंधाराच्या रूपानं ते हरवून जातं. अंधाराच्या रुपानं, जौवनाचा न्हास करणारा, माणसाचं अस्तित्व पुसून टाकणारा मृत्यूचा काठ दिसू लागतो. उन्हाचं तळं आटून जातं आणि मागे उरतात अजस्त्र पावलांचे ठसे!

प‌द्मितीबाईच्या कवितेत माणसामाणसांत उमलणारी मिटणारी संमिश्र नाती ऊन- अंधाराच्या संघर्षांतूत चित्रित होतात. या कवितेतला अंबार हा बन्याचवेळा मानसिक दुराव्याची, नातं संपत्याची खूण म्हणून येतो. सूर्यप्रकाशी स्पर्शानं सुगघाची बेल फुलत असतानाच प्रकारा आवरून घेतला जातो. ऊन-अधार हे दोन विरोधी आविष्कार निसर्गातील घटना, जीवनोत्लाहाचं व जीवन म्हागाचं प्रतीक आणि मानवी नाती चित्रित करणाऱ्या प्रतिमा म्हणून येतात.

आपली स्वतःची अभी एक प्रतिमासृष्टी घेऊन येणारी ही लोभसवाणी कविता बाचकाला भुलवून टाकील हे निःसंशय.

ISBN: 978-81-966313-4-5

Number of pages: 88

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 1980

 

Weight 0.200 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm