Mazi Geeta (माझी गीता) – Devdutt Pattanaik (देवदत्त पट्टनायक)
पौराणिक कथा आणि दंतकथा यांचे ख्यातकीर्त अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी ‘माझी गीता’ या ग्रंथात आजच्या वाचकासाठी भगवद्गीतेचे गूढ उकलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे पट्टनायकांनी गीतेची श्लोकानुसारी मांडणी न करता विषयानुसारी मांडणी केली आहे. त्यामुळे हा आर्षकालीन ज्ञानाचा खजिना सर्वांना अगदी सहज आजच्या भाषेत उपलब्ध झालेला आहे. सखोल विवेचनासह या पुस्तकात पट्टनायक यांनी स्वतःच रेखाटलेल्या विविध आकृत्या आणि चित्रे ही पट्टनायकांची निजखूण आहे असेच म्हटले पाहिजे.
संवादापेक्षा विवादालाच भुलणाऱ्या या जगात कृष्ण अर्जुनाला त्याच्या नातेसंबंधांविषयी कसलाही पूर्वग्रह मनात न ठेवता ते समजून घेण्यासाठी प्रवृत्त करतो, याकडे पट्टनायकांनी आपले लक्ष वेधलेले आहे.
आज आपण अधिकाधिक आत्मरत आणि आत्मकेंद्री (स्व-सुधारणा, स्वजाणीव आत्मानुभव स्वप्रतिमादेखील ) होत असताना हे विचार – महत्त्वाचे ठरतात. आपण परस्परावलंबी जीवन जगत असतो, याचाच विसर आपल्याला पडतो; जिथे आपल्यांत विवाद असूनही अन्न, प्रेम आणि आदर यांद्वारे आपण परस्परांचे पोषण करू शकतो.
तेव्हा ‘माझी गीता’ आणि तुमची गीता यांचा एक सुखद संगम आपण अनुभवू या!
ISBN: 978-81-7991-959-0
No. Of Pages: 336
Year of Publication: 2019