Vasant Aabaji Dahake (वसंत आबाजी डहाके) – Marathiteel Kathanaroope (मराठीतील कथानरूपे)
मराठी साहित्याच्या क्षेत्रात कविता, कथा, कादंबरी, ललितलेखन ह्या सर्व क्षेत्रांत वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे.
‘मराठीतील कथनरूपे’ हे पुस्तक लिहिताना डहाके यांच्यातील सृजनशील कलावंत, समीक्षक आणि अध्यापक हे जागृत आहेत. एकनाथांनी ज्याला ‘कथाजगदंबा’ म्हटले त्या साहित्यप्रकाराचे भिन्न अवतार सांगताना मौखिक आणि लिखित परंपरांचे भान ठेवले आहे. कहाणी, कथागीत, लीळा, आख्यानकाव्य, बखर, ललितगद्य या सर्वांचा परामर्श होऊन त्यानंतर कथेच्या विविध प्रकारांतील कथनशैलीचा अभ्यास केला आहे. साहजिकच जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांचा आणि रूपककथांतील कथन पद्धतीचा विस्तारपूर्वक अभ्यास केला आहे. विज्ञानकथा, लोककथा आणि रहस्यकथा यांच्या शैलीकडे प्रथमच लक्ष वेधले आहे.
कादंबरीतील कथाकथन हा एक विस्तृत विषय आहे. त्यांचा अभ्यास करताना बी. रघुनाथ, मनोहर शहाणे आणि गेल्या अर्धशतकातील पौराणिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या यांचा आधार घेतला आहे. गॅब्रिएल गार्सिया मार्खेज यांच्या दोन लघुकादंबऱ्यांच्या अभ्यासामुळे ह्या विवेचनाला वेगळी खोली प्राप्त झाली आहे.
‘कथा आणि वास्तव’ आणि ‘कादंबरीविषयी’ ह्या दोन लेखांमुळे ह्या अभ्यासपूर्ण संकलनाला पूर्णत्व मिळाले आहे.
ISBN: 978-81-7185-565-0
Number of pages: 244
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2012