Becket (बेकेट) – Jean Anouith ज्याँ अनुई / Tr. V. V. Shirwadkar (अनु. वि. वा. शिरवाडकर)
दोन प्रबळ वृत्तींमधील संघर्ष, ह्या प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींतील द्वंद्व हा प्रतिभावंतांना सतत लोभावणारा विषय ज्याँ आनुई ह्या फ्रेंच नाटककाराने इंग्लंडच्या इतिहासातील दुसरा हेन्री आणि टॉमस बेकेट यांच्या परस्पर संबंधाची निवड करताना त्याला फार वेगळी डूब दिली. त्यांना उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यांनी ह्या संघर्षाला सॅक्सन आणि नॉर्मन यांच्यातील संघर्ष मानले. पण त्याहून महत्त्वाचा भाग म्हणजे मुळात हातात हात घालून उनाडणारे हे मित्र परिस्थिती बदलताच एकमेकांचे कट्टर शत्रू कसे बनतात आणि तरीही त्यांची एकमेकांची ओढ जात नाही. ह्याच नात्यासंबंधी अनेकांनी लिहिले आहे. तरीही आनुईच्या नाटकातील नाट्य विशेष चटका लावणारे आहे.
शेक्सपीयर, टॉलस्टॉय, मॅटरर्लिक, ऑस्कर वाईल्ड इत्यादिकांची मराठी वाचकांची भेट शिरवाडकरांनी रूपांतराच्या किंवा स्वैर रूपांतराच्या मार्गाने करून दिली. परंतु ‘बेकेट’ हे एकच नाटक त्यांनी मुळाबरहुकूम अनुवादित केले.
हे नाटक १९७१ साली प्रसिद्ध झाले. त्याची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती. संहिता आणि नाट्यप्रयोग यांविषयी लेखक, प्रकाशक आणि नाट्यकर्मी बाळ धुरी आणि रवी पटवर्धन यांची टिपणे दिली आहेत.
ISBN: 978-81-7185-646-6
Number of pages: 116
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2012