Phulwa (फुलवा) – Sharadini Dahanukar (शरदिनी डहाणूकर)
गंधभरी गाणी गाणारी फुलपाखरं उमलताना दिसलीत का कधी तुम्हाला? तेरड्याच्या परकऱ्या पोरींना, वेणीचा शेपटा उडवत झिम्मा फुगडी खेळताना पाह्यलंय् का कधी तुम्ही? सुष्टीचे असे नित्य सोहळे लुटण्यासाठी ‘फुलवा’ नं मुद्दाम साद घातली आहे. हे चित्रण आहे सृष्टीच्या निर्मितीतील एका सुरम्य, रंगीन आणि सुवासिक अध्यायाचं… यातली फुलं दर दिवशी उत्सव साजरा करीतच येतात… रंगगंधांबरोबरच नृत्याचा आणि लावण्याचा. या उत्सवांचं वर्णन वाचताना आपणही नकळत या जत्रेत फिरू लागतो. मग तळ्यातल्या पंचायतनातून लेखिकेला दिसलेलं उत्सवमूर्ती असं कमळ आपल्याला दिसतं, अबोलीच्या कळ्यांतून उगवतीच्या दीपकळ्या
दिसू लागतात. आणि घाणेरी, रुई अशा उपेक्षित फुलांचं सौंदर्य नव्यानं नजरेत भावू लागतं. त्यातून लेखिका ही जशी फुलवेडी तशीच शास्त्रज्ञ असल्यामुळे ‘फुलवारीची सैर’ करताना रुईच्या अर्कशर्करेची आणि पानांत सैलीसिलिक ऐसिड साठवणाऱ्या चमेलीच्या पिंकहेल्थचीही आपली ओळख होते. कमळापासून जुईपर्यंत अन् झेंडूपासून रुईपर्यंत सर्व नित्यपरिचयाच्या फुलांविषयी अधिक आपलेपणा फुलवणारा असा हा ‘फुलवा’ – तुमच्या आमच्या मनात फुलण्यासाठी.
ISBN: 978-81-7185-393-9
Number of pages: 126
Language: Marathi
Year of Publication: 2nd Ed. 2024