Priya Babuaanna (प्रिय बाबुआण्णा) – Nanda Paithakar (नंदा पैठणकर)
आपल्या लेखनाइतकेच गूढ गंभीर वलय जी.ए. कुलकर्णी यांच्याभोवती निर्माण झालेले होते. जीएंच्या कथांचा अनेक अंगांनी वेध घेतला जात असला तरी ते प्रत्यक्षात कसे होते यासंबंधी वाचकांना सातत्याने कुतूहल वाटत राहिले आहे. धारवाडला अनेक वर्षे जीए, प्रभावती आणि नंदा या आपल्या मावस बहिणींसोबत राहत असत. पुढे नंदा पुण्याला आल्या त्या सुनीता पैठणकर म्हणून. त्यानंतर जीएंची अखेरची वर्षे पुण्यात गेली. नंदा पैठणकर यांनी आपल्या बाबुआण्णाचे रेखाटलेले हे हृद्य शब्दचित्र हा जीएंच्या चाहत्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे. ह्या चित्रणात नंदाताईंनी जीएंच्या लेखनाविषयी लिहिणे जाणीवपूर्वक टाळले आहे. ‘माझ्या लेखनातूनच मला शोधा’ असा आग्रह धरणारे जी.ए. कुलकर्णी यांना एक कौटुंचिक बाजू होती. आपल्या ह्या दोन्ही मावस बहिणींची जबाबदारी त्यांनी प्रेमाने स्वीकारली आणि समर्थपणे पार पाडली. ते एक उत्तम शिक्षक होते याचाही पडताळा पहिल्यांदाच ह्या लिखाणातून मिळतो. शेजारचा मुलगा आताउल्ला याच्याशी जडलेले नाते आणि त्यांनी लव्हबर्ड्सची केलेली देखभाल यातून दिसणारे जीए तर विलक्षण विलोभनीय आहेत.
ISBN: 978-81-7185-541-4
Number of pages: 162
Language: Marathi
Cover: Hardbound
Year of Publication: 2012