प्रवाशी पक्षी : कुसुमाग्रज

195.00 Original price was: ₹195.00.156.00Current price is: ₹156.00.

28 in stock

Category:

Pravasi Pakshi (प्रवाशी पक्षी) – Kusumagraj (कुसुमाग्रज)

कविवर्य कुसुमाग्रजांनी आजवर कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललितनिबंध असे विविध प्रकारचे साहित्य लिहिले असून त्याद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. या सर्व साहित्यात त्यांचे | काव्य आणि नाटक हे वाङ्मयप्रकार विशेष गाजलेले असून त्यांचा ठसा मराठी मनावर उमटलेला दिसतो. या दोहोंतही कवितेचा ठसा अधिक खोलवर उमटलेला आहे असे जाणवते. हा ठसा केवळ रसिकांच्या मनावर उमटला आहे असे नाही तर कुसुमाग्रजांच्या सौंदर्यदृष्टीचा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झालेला आहे, असेही आढळून येते. कुसुमाग्रजांची कविता ही, केशवसुतांपासून निर्माण झालेल्या एका वैभवशाली कालखंडातला महत्त्वाचा भाग असून ती गेली जवळ जवळ साठ-पासष्ट वर्षे नवनवीन उन्मेशांनी बहरत राहिलेली आहे.

कुसुमाग्रजांच्या ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’ व ‘पाथेय’ या तीन संग्रहांतील निवडक कवितांचा ‘प्रवासी पक्षी’ हा संग्रह असून ‘रसया-inters वीस वर्षातील कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्वरूप या संकलनाद्वारे वाचकांना एकत्रितपणे पाहावयास मिळेल

ISBN: 978-81-7185-384-7

No. Of Pages: 118

Year Of Publication: 1989

Weight 100 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.8 cm