Popatpanchi (पोपटपंची) – Shafaat Khan (शफाअत खान)
शफाअत खान यांचे ‘पोपटपंची’ हे नाटक आजच्या परिस्थितीवरचे अत्यंत कडवट, अत्यंत खरे आणि अत्यंत भीतीदायक असे भाष्य आहे. एकविसाव्या शतकातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व्यवहारातील फोल उथळपणा त्यांच्या नाटकाने नेमका पकडला आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला खुजेपणा, सर्व क्षेत्रांमध्ये देवसदृश प्रेषितांना आलेले महत्त्व, अर्थ हरवलेले मानवी नातेसंबंध, स्वार्थासाठी पर्यावरणाचा घास घ्यायला तयार होणे, जगण्याच्या वरवरच्या चकचकीत शैलीला महत्त्व देत निर्माण होणारी शहरे, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि श्रम यांचा निरोप घेऊन जवळच्या वाटेने लवासासारखी नंदनवने गाठायची लागलेली ओढ! यांमधून कोणतेही क्षेत्र वगळता येत नाही. परंपरा, धर्म, साहित्य, कला, ज्ञान, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, नगरविकास, रस्ते, प्रशासन इत्यादी सर्वांना ग्रासू पाहणाऱ्या या रोगाची साथ वेगाने फैलावू लागलेली आहे. शफाअत खान यांनी तिचे नेमके निदान ‘पोपटपंची’ मधून केले आहे.
ISBN: 978-81-7185-802-6
Number of pages: 72
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2011