Pidhijaat / Mickey Ani Memsaheb (पिढीजात/ मिकी आणि मेमसाहेब) – Satish Aalekar (सतीश आळेकर)
या पुस्तकात ‘पिढीजात’ आणि ‘मिकी आणि मेमसाहेब’ अशी दोन नाटके आहेत.
‘पिढीजात’ हे सगळ्यात अलीकडचे अतिशय महत्त्वाचे नाटक. आळेकरी शैलीची सर्व वैशिष्ट्ये असलेले हे नाटक एकाच राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पातळीवरच्या नैतिक घसरणीविषयी बोलते, आणि पुन्हा या घसरणीबद्दल टाहो न फोडता, नीतीमत्तेचे डांगोरे न पिटता या पेचाला सहृदयतेने सामोरे जाते, त्यातली गोची समजून घेते आणि या काळातल्या ‘बाप’ पिढीची शोकांतिका मांडत पुढल्या पिढीचे न-नैतिक होणेही दाखवते.
‘मिकी आणि मेमसाहेब’ या नाटकाचे कथानक प्राध्यापक पती, त्याच्याच हाताखाली लेक्चरर म्हणून काम करणारी त्याची तरुण पत्नी (मेमसाहेब), काही कारणाने अनेक वर्षे रिसर्च अडकलेला त्याचा विद्यार्थी गुळवणी आणि त्याच्या प्रयोगशाळेतील एक उंदीर (मिकी) यांच्या भोवती फिरते.
वरवर साधे वाटणारे हे नाटक पूर्णपणे प्रतीकात्मक आहे हे हळूहळू लक्षात येत जाते. सरळ विधान करणे कटाक्षाने टाळत, अतिशय कलात्मकतेने आळेकरांनी प्रेक्षकांसमोर प्राध्यापकाची शोकांतिका मांडली आहे. वरकरणी सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये खोलवर दडून असलेली हिंस्रता या नाटकातून व्यक्त होते. प्राध्यापकाची होणारी घुसमट, कुचंबणा, वेदना, संताप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा वांझ विद्रोह हे सारे आळेकरांनी अत्यंत प्रभावी अशा स्वगतांमधून व्यक्त केले आहे. संपूर्ण नाटक बऱ्याच अंशी मानसिक पातळीवरच घडताना दिसते तरीही आळेकरांना जे सांगायचे आहे ते सहजतेने प्रेक्षकांपर्यंत पोहचते हे या नाटकाचे मोठे यश आहे.
ISBN: 978-81-956688-6-1
No. Of Pages: 92
Year of Publication: 2022