पाणी, चारो, आरो इत्यादी… : धर्मकीर्ती सुमंत

55.00

Fiction

Category:

Pani, Charo, Aaro Ityadi (पाणी, चारो, आरो इत्यादी…) – Dharmakirti Sumant (धर्मकीर्ती सुमंत)

वैचारिकता न नाकारता, समाजभान, परिस्थितीभान आणि मुख्य म्हणजे काही किमान ऐतिहासिक भान ठेवून हा लेखक लिहू पाहत आहे. स्वतः ‘विचार’ करून पाहणारा आणि ‘विचारप्रवृत्त’ करू पाहणारा असा हा तरुण लेखक आहे.
‘पाणी’ हे जास्त विचारप्रवृत्त करणारे नाटक आहे. सद्यःस्थितीतील निरनिराळ्या सामाजिक-राजकीय चळवळींमधील काही प्रश्नांना लेखक अगदी सरळसरळ भिडतो. साधक-बाधक विचार करून, प्रसंगी आत्मटीकाही करणारा बुद्धिवादी लेखक आणि प्रत्यक्ष चळवळीचे प्रश्न, लढ्यातील व्यूहरचना यांचा विचार करणारा अस्सल कार्यकर्ता या दोघांतील निर्माण होणारा तणाव हा नाटकाचा मुख्य विषय. हा विषय धर्मकीर्ती सुमंत वयापलीकडे जाणाऱ्या प्रगल्भतेने हाताळतात.
‘चारु, आरो’ या नाटकात लग्नाचे बंधन टाळून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची तयारी असणारे एक प्रेमिकांचे जोडपे, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, संवाद आहे. प्रस्तुत जोडप्यात आता काही कारणाने दुरावा निर्माण होत आहे. हा दुरावा दोन व्यक्तींच्या जगण्यामागील धारणा भिन्न असण्यातून होत जातो. दोन व्यक्तींमधले संबंध आणि सामाजिक बाबी या दोन्हींमधले अनेक प्रकारचे ताण धर्मकीर्ती यातून उलगडत जातात.
धर्मकीर्ती सुमंत यांची ही दोन्ही नाटके केवळ बघण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर वाचण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. भविष्यात त्यांच्या वाटचालीबद्दल खूपच उत्सुकता निर्माण व्हावी अशी आहेत.

— मकरंद साठे

ISBN: 978-81-7185-702-9

Number of pages: 68

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2011