निरर्थकाचे पक्षी : नीरजा

165.00

Fiction

Category:

Nirarathakache Pakshi (निरर्थकाचे पक्षी) – Neeraja (नीरजा)

नीरजाची कविता ही साधी थेट, तरीही सार्वत्रिक अशी आहे. वयात आलेल्या मुलीपासून दंगल, तृष्णेचा प्रश्न, महिला स्पेशल, वाळकेश्वर, महाभारतातील द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, द्रौपदी हे तिच्या कवितेचे विषय पाह्यले कि चकित व्हायला होते. महाभारताने साऱ्या माणसांबद्दल एकदाच फायनलच बोलून टकलंय, मग बोलायला काय उरतं? पण नीरजाची द्रौपदी जेव्हा, ‘मोकळ्या केसात माळावा गजरा लाल तांबड्या मांसाचा’ अशी दचकवून टाकणारी ओळ लिहिते तेव्हा त्या शोकान्त बीभत्स, संहारक उपहासाची विसंगत दहशत या विरोधाभासामुळे कुठंतरी करुणा, त्याचवेळी नकोसेपण जाणवून जाते तीव्रपणे. ईश्वराबद्दल ती सहज लिहून जाते की, ‘ईश्वर मरणाचं ओझं वाहो’ ही ब्लेक कॉमेडी अेब्सर्डीटीकडे जाणारी चमकदार ओळ वाचली कि एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक गोष्टींकडे ती कमालीच्या वेगळ्याच दृष्टीने बघताना दिसते. अर्थात कवी वेगळंच काहीतरी बघतो. पण आताच्या कन्सेप्टमधलं व्यवस्थेतलं कवीचं बघणं बदललंय… जास्त टोकदार, खोल घाव घालणारी पण तरीही ईश्वरापासून दंगलीपर्यंत अशा सर्वांवर कधी खोचक कधी भेदक भाष्य करणारी नीरजाची कविता सर्वत्रिकाशी आपसूक बांधली जाते. जसं ‘…आणि पोरीच्या अंगात तर पावसाळाच रुतून बसलेला कायमचा!’ असं काहीतरी भलतंच मायावी, मर्मभेदक ती लिहून जाते. नीरजाच्या कवितेला ही सृजनाची शक्ती आहे.

ISBN: 978-81-7185-893-4

Number of pages: 164

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2010

Weight 0.205 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm