Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर) : Niyateechya Bailala (नियतीच्या बैलाला)
विजय तेंडुलकर यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनातून चतुरस्त्र औत्सुक्य आणि सामाजिक व राजकीय गुंतागुंतीची जाणही आढळून येते. त्यांनी आपल्या नाटकांतून प्रामुख्याने मानवी संबंधांचाच शोध घेतला असला तरी त्यामागील सामाजिक मनाची तडफड स्पष्ट दिसते. ‘दंबद्वीपचा मुकाबला’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘पाहिजे जातीचे’ यांसारख्या नाटकांत जरी त्यांच्या राजकीय विचारांचा अंतर्भाव झाला असला तरी आतापर्यंत त्यांच्या लेखणीचा हा पैलू त्यांच्या चित्रपटकथांमधूनच अधिक दिसला होता.
‘नियतीचा बैलाला’ हा त्यांच्या राजकीय विचारांचा रंगभूमीवरील पहिला स्फोट आहे. एका फॅण्टसीवजा कल्पनेच्या रूपाने त्यांनी राजकारणी पुरुषांची टवाळी केली आहे; तरी त्यामागे सामान्य माणसाच्या मनात ठुसठुसणारी चीड व्यक्त करणे हा खरा हेतू आहे. स्वार्थी, संधिसाधू राजकारण्यांना दिलेला हा इशारा आहे.
विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफितीवरील वाचनात हे आव्हान श्रोत्यांना बैचेन करून सोडते.
ISBN : 978-81-7185-575-9
Number of pages : 40
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.
Language: Marathi
Year of Publication : Reprint 2025