धृपद – विंदा करंदीकर

185.00 130.00

कविता

Sold out

Out of stock

Category:

Dhrupad

‘धृपद’ हा विंदा करंदीकरांचा तिसरा कवितासंग्रह. ‘स्वेदगंगेपासून ‘धृपदा’ पर्यंत करंदीकरांच्या भावकाव्यातील अनुभूतीची उत्कटता व विविधता सतत वाढतच गेली आहे. या उत्कट, संमिश्र व प्रगल्भ भावानुभवाचे रूप करण्यासाठी काव्याच्या घाटाचे प्रयोग करीत राहण्याची त्यांची प्रेरणाही सतत विकास पावली आहे. ‘धृपदा’तील प्रगल्भ भावानुभव हा आशा वा निराशा या रूढ सांकेतिक वर्गीकरणात सामावणारा नाही. विश्ववास्तवाशी संलग्न असलेली अंतिम भयाची जाणीव व प्रत्यक्ष जीवनाविषयी वाटणारी अपरिहार्य ओढ या दोन्ही या नव्या अनुभवात एकरूप झाल्या आहेत. या जाणिवेला घाट देताना करंदीकर भाषेच्या सर्व अर्थशक्ती एकदम कार्यान्वित करतात; त्यामुळे संवेदना, भावना व विचार यांचे एकात्म स्वरूप जाणवू लागते. कधी शब्दांचा भावनानिष्ठ क्रम वापरून, कधी भावानुसारी अनुप्रास व नव्या शब्दसंहती निर्माण करून, तर कधी लयीतील आघात, विराम, उत्सेक या तत्त्वांचा अभिनव उपयोग करून करंदीकर विलक्षण प्रभावी अभिव्यक्ती साधतात. मुक्तसुनीताप्रमाणे जुने घाट नव्या आशयाला सक्षम करून वापरतात; तर नवे वास्तव, नवे विचार, नवा जीवनानुभव मराठी रक्तात भिनलेल्या अभंगांत मांडून प्रयोगाचा परंपरेशी सांधा जुळवतात. घाट व भाव यांतील ताणाने प्रभावित झालेली ‘धृपदा’तील त्यांची कोणतीही कविता वाचली की, कवितेचे नित्य नवे सामर्थ्य प्रत्ययाला आणणाऱ्या त्यांच्या उद्दाम प्रतिभेचा भारावून टाकणारा अनुभव येतो – आणि कवितेच्या नव्या उन्मेषावरील विश्वास दृढावतो.

ISBN: 978-81-7185-014-3

No. of pages: 120

Year of Publication: 1959