The Live Well Diet: Uttam Arogya Ani Vajan Niyojan Yanvishaiche Yogya Margdarshan (द लिव्ह वेल डाएटउत्तम आरोग्य आणि वजन नियोजन यांविषयीचं योग्य मार्गदर्शन) – Dr. Sarita Davre and Sanjeev Kapoor (डॉ. सरिता डावरे आणि संजीव कपूर)
डॉ. सरिता डावरे आणि मास्टर शेफ संजीव कपूर यांनी मिळून लिहिलेले ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते.
‘द लिव्ह वेल डाएट’ ही जीवनशैली आहे. अधिक चांगलं जगण्याची गुरुकिल्ली. ज्यांच्या दृष्टीने निरोगी, सुडौल आणि चैतन्यपूर्ण असणं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. डॉ. सरिता डावरे आणि मास्टर शेफ संजीव कपूर यांनी मिळून लिहिलेले ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते. डॉ. डावरे यांनी अनुभवातून सांगितलेले सोपे, व्यवहार्य आणि लवचिक डाएट आणि व्यायामाचे योग्य तंत्र यांच्या साथीने मास्टर शेफ संजीव कपूर यांनी पारखलेले अतिशय चविष्ट आणि तरीही पौष्टिक, कमी कॅलरीचे पदार्थ ही या पुस्तकाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सोप्या, स्वादिष्ट, पोषक, झटपट आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून करता येणाऱ्या या पाककृती आहेत. थोडक्यात म्हणजे आपल्या रोजच्याच जेवणात किंचित बदल करून आपण आपले आरोग्य किती सांभाळू शकतो हे या पाककृतींवरून लक्षात येईल.
डॉ. सरिता डावरे यांनी संपूर्ण आठवड्यासाठी आलटून पालटून घ्यायचे तीन प्रकारचे डाएट प्लॅन तयार केले आहेत जे शरीरातली अतिरिक्त चरबी नष्ट करायला मदत करतात आणि त्याचवेळी शरीराला आवश्यक असलेली सगळे पोषक घटक योग्य प्रमाणात पुरवतात.
पौष्टिक, आरोग्यवर्धक आणि तरीही कमी कॅलरीचे चविष्ट अशा पदार्थांचे दिवसभराचे नियोजन केलेला संपूर्ण आठवड्याचा तपशीलवार तक्ता हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एका दृष्टिक्षेपात रोजचा मेन्यू आणि त्याचे नियोजन या तक्त्यामुळे लक्षात येते.
आपला शारीरिक फिटनेस सांभाळण्याची गरज असलेले चित्रपट सृष्टीतील आणि इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच विविध शारीरिक व्याधींनी त्रासून गेलेले सर्वसामान्य रुग्ण यांनी डॉ. डावरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी लिहिलेले आपले अनुभव वाचकांच्या मनात या आहारपद्धतीविषयी सकारात्मक विचार निर्माण करत त्यांनाही या आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे आकर्षित करतील यात शंका नाही.
डॉ. सरिता डावरे आणि मास्टर शेफ संजीव कपूर यांनी मिळून लिहिलेले ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचे सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करेल कारण हे पुस्तक योग्य आणि अयोग्य खाण्यातला फरक नेमका समजावून सांगतेच पण त्याहूनही जास्त निरोगी आणि आनंदी जगण्याविषयी सांगते. पौष्टिक, आरोग्यवर्धक आणि तरीही कमी कॅलरीचे चविष्ट अशा पदार्थांचे दिवसभराचे नियोजन केलेला संपूर्ण आठवड्याचा तपशीलवार तक्ता हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एका दृष्टिक्षेपात रोजचा मेन्यू आणि त्याचे नियोजन या तक्त्यामुळे लक्षात येते.
ISBN: 978-81-7185-497-4
No. of pages: 360
Year of publication: 2014