Devichi Saat Rahasye
आपल्या पूर्वजांनी हे जीवनचक्र चालू राहण्याच्या दृष्टीने जो विचार केला तो आपल्या पुराणकथांमध्ये सामावलेला आहे. शिव, विष्णू, ब्रह्मा, देवी किंवा आदिशक्ती या संकल्पना आणि त्यांची अनेक रूपे यांच्यामागे वेगवेगळे अर्थ आहेत. स्त्रीच्या लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, काली अशा रूपांबरोबरच देवदत्त पट्टनायक यांनी पाश्चात्त्य पुराणात येणाऱ्या ‘गाया’ या स्त्रीरूपाचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. समृद्धी (लक्ष्मी), ज्ञान (सरस्वती), प्रेम (दुर्गा) आणि शक्ती (काली) अशा स्त्रीमध्ये एकवटलेल्या गुणांचा विचार करतानाच एकूणच स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन कसा बदलत गेला आणि मानवी समाजाचा प्रवास मातृसत्ताक पद्धतीकडून पितृसत्ताक दिशेने कसा झाला, स्त्रीवर बंधने का येत गेली याही प्रश्नांचा ऊहापोह पट्टनायक यांनी या पुस्तकात केला आहे.
ISBN: 978-81-7991-892-0
No. Of Pages: 270
Year Of Publication: 2016