देवबाभळी – प्राजक्त देशमुख

135.00 94.50

कविता

Category:

Devbabhali

आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा ही आपल्या सर्व साहित्य, नाटकांमधून पुढे यायला हवी. ती गेली काही दिवस मागे गेली होती असं वाटत होतं, पण हा नाटकाच्या निमित्ताने ती पुन्हा केंद्रस्थानी आलेली आहे असं आता वाटू लागलंय. – भालचंद्र नेमाडे

हे त्याला कसं सुचलं असेल? हे नाटक म्हणजे ‘Something to feel proud about’. – डॉ. विजया मेहता

ह्या नाटकातून मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे काय असं जर मला कुणी विचारलं तर मी हा नाटकाकडे बोट दाखवेन. मला असं वाटतं की, अलीकडच्या दहा-बारा वर्षांतल अतिशय उजवं आणि अतिशय चांगलं, बांधेसूद नाटक आहे. पूर्वी ‘लेकुरे उदंड झाली’ आलेलं होतं… कानेटकरांच. त्याच्या नंतर ‘घाशीराम कोतवाल’ आलं होत, ‘बेगम बर्वे’ होत. त्यानंतर आताच्या काळातलं संगीत रंगभूमीचं एक वेगळ्या पद्धतीचं मापन हे प्राजक्तने केलेलं आहे. – सतीश आळेकर

प्राजक्तने जे पकडलंय ते फक्त दोघींचं नसून कित्येक शतकांचं युगांच, जगातल्या प्रत्येक बायकांचं आहे. समर्पणाने काय निर्माण होतं, एक दुःखाचा सूर आहे जो उमटला नाही कित्येक शतकं, जो दबलेला आहे. नाहीच आला बाहेर. तो नेमका बाहेर काढलेला आहे प्राजक्तने. न संपणारी युगायुगांची स्त्री जन्माची कहाणी! – डॉ. अरुणा ढेरे

लेखन फारच सुंदर आहे. इतक्या तरुण माणसाने इतकं सखोल लिहिणं, आध्यात्माची जाण आहे. मानवी नात्यांच सुंदर वर्णन आहे. बाईच मन समजावून घेत अनेक बाजूंनी सुंदर असं लेखन झालेलं आहे. – सुमित्रा भावे

ISBN: 978-81-7991-963-7

No. of pages: 72

Year of Publication: 2018