देर्दा – हकन गुंदे

375.00 Original price was: ₹375.00.300.00Current price is: ₹300.00.

Derda

विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.

सुप्रसिद्ध तुर्की लेखक हकन गुंदे यांच्या या कादंबरीमध्ये देर्दा नावाच्या दोन व्यक्तिरेखा आहेत. दोन वेगवेगळ्या प्रतलांवर जगणारे दोन देर्दा, समवयस्क आणि भिन्नलिंगीय – एक स्त्री आणि एक पुरुष. एक देर्दा, जो कब्रस्तानात, कबरी धुण्याचं काम करत लहानाचा मोठा होत असताना एका क्रांतिकारी तुर्की साहित्यिकाच्या कबरीवर कोरलेली काही अक्षरे, त्याला जगण्याकरता प्रेरणा पुरवत आहेत, परिस्थितीमधून बाहेर पडून काहीतरी वेगळे करण्याचे प्रोत्साहन त्याच्याही नकळत पुरवत आहेत. आणि मग तो स्वतःही पुस्तकांच्या सहवासात ओढला जातो. पुस्तकाचे हे जग पायरेटेड प्रती छापून त्याचा एक समांतर साहित्यिक व्यवहार जोपासणारे. तिथून मग तो गुन्हेगारी, तुरुंगवासाच्या मार्गाने वाहत जातो. तिथे त्याला जाणीव होते त्या दुसऱ्या देर्दाची, जी इस्तंबूलच्या परिघावरच्या एका खेड्यामधे, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या परिसरात अनाथ जगत असताना अल्पवयात निकाहनामा होऊन लंडनला जाते आणि तिथे पुढची दहा वर्षे नजरकैदेत जगते. एक बंद फ्लॅट हेच तिचे आयुष्य. समांतर जगणाऱ्या या दोन देर्दांची विश्वे एकमेकांना छेदून जाईपर्यंतचा प्रवास आणि नंतरचे त्याचे एकत्रित आयुष्य जितके वास्तव तितकाच त्यांचा हा प्रवास अद्भुत आणि मानवतेच्या मूलभूत भावनांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणारा.

तुर्की भाषेतली अ झ ही दोन अक्षरे एकत्रितपणेच उच्चारावी लागतात. या दोन अक्षरांमधली अनेक अक्षरे, अनेक अर्थाच्या छटा ओलांडून एकमेकांपर्यंत पोहोचावे लागते. दोन्ही देर्दांची आयुष्येही या अक्षरांसारखीच या अक्षरांमुळेच एकमेकांजवळ आलेली. एकमेकांपासून पूर्ण वेगळी, काहीच समांतर नाही. दोन वेगळ्या संस्कृती, त्यांचे एकमेकांकडे बघण्याचे पूर्ण भिन्न, एकमेकांना अजिबात समजून घेऊ न शकणारे दृष्टिकोन, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींमधला बदल हा भाषिक फरकाहून किती खोलवर रुजलेला आहे आणि खरी गरज आहे ती सांस्कृतिक अनुवादांची हे पुन्हा ह्या कादंबरीच्या निमित्ताने जाणवते.

ISBN: 978-81-7185-493-6

No. of pages: 290

Year of publication: 2015

Weight 0.59 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1.4 cm