दर्शन : श्याम मनोहर

65.00

Fiction

Category:

Darshan (दर्शन) – Shyam Manohar (0श्याम मनोहर)

वीसेक वर्षांचा कुमार छोट्या शहराच्या एका खाजगी वसतिगृहातल्या त्याच्या खोलीत एका रात्री अभ्यास करतोय. खोलीत डासांचा त्रास होतोय. कुमारला बीएस्सी व्हायचेय. शिवाय नाटककारही व्हायचेय. आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अभ्यास करता करता कुमार भविष्याचाही विचार करतो. भंगारवाला, रिक्षावाला, अणुशास्त्रज्ञ, लोकप्रिय नाटककार ह्या स्वरूपात कुमारला स्वतःचे भविष्य दिसते. कुमार घाबरतोही, उत्तेजितही होतो. सांस्कृतिक वातावरणात परिवर्तनवादी आणि पुनरुजीवनवादी ह्यांचा संघर्ष चालू आहे. ‘आपण परिवर्तनवादी व्हायचे की पुनरुजीवनवादी व्हायचे?’ असाही संघर्ष कुमारच्या मनात आहे. कुमारला देवही भेटतो. कुमारची आणि देवाची मारामारी होते… एका रात्रीत इतके पडते आणि ‘दर्शन’ निर्माण होते.

श्याम मनोहर यांचे आतापर्यंत दोन कथासंग्रह, चार कादंबऱ्या, तीन नाटके प्रसिद्ध झाली आहेत. कराड पुरस्कार, के. ह. ना. आपटे पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, गंगाधर गाडगीळ पुरस्कार,के. रा. ग. गडकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

ISBN: 81-7185-820-1

Number of pages: 68

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2004

Weight 0.90 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm