थोर संगीतकारांची परंपरा – बी. आर. देवधर

450.00 Original price was: ₹450.00.360.00Current price is: ₹360.00.

Non-Fiction

B. R. Deodhar बी. आर. देवधर थोर : Thor Sangeetkaranchi Parampara संगीतकारांची परंपरा

जगातील सर्व संगीतशास्त्रात भारतीय संगीत श्रेष्ठ समजले जाते. या संगीतशास्त्राच्या उपासकांतील एक वंदनीय नाव म्हणजे ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा’चे माजी कार्याध्यक्ष आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य बी. आर. देवधर ! ‘संगीतकलाविहार’ या मासिकासाठी त्यांनी लिहिलेल्या निवडक व्यक्तिचित्रांचे ‘थोर संगीतकारांची परंपरा’ हे दुसरे पुस्तक. यापूर्वी १९७३ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेले ‘थोर संगीतकार’ हे निवडक एकवीस व्यक्तिचित्रे असलेले पुस्तकही अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहे.
या सर्वच व्यक्तिचित्रणात्मक लेखांतील लिखाण इतके पारदर्शी आहे की, त्यातून प्रत्येक संगीतकाराचे व्यक्तिमत्त्व आपल्या नजरेसमोर स्पष्ट होते.
प्रामाणिक, प्रांजळ आणि अधिक अभ्यासास प्रवृत्त करणाऱ्या या लिखाणातून विशिष्ट कालावधीतील संगीतमय इतिहासाची ओळख झाली आहे. समावेशक नजरेने गोळा केलेली, सहज समजणारी वेधक माहिती देत असतानाच देवधरांनी कलाकारांचे गुरू, घराणे, वास्तव्याचे स्थान यांची माहिती व विशेष म्हणजे कलाकाराचा स्वभाव व त्याची कला यांचा संबंध यांविषयी सांगून या कलाकारांचे अल्पचरित्र उत्कृष्ट शैलीतून रसिकांना उपलब्ध करून दिले आहे. दुर्मीळ छायाचित्रांमुळे या पुस्तकाचे संदर्भमूल्य अधिकच वाढले आहे.

ISBN : 978-81-7185-938-2

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd

Language: Marathi

Number of page’s : 242

Year of Publication : 1st Reprint 2026

Dimensions 21.59 × 13.97 cm