तिळा तिळा दार उघड : तारा वनारसे

120.00 Original price was: ₹120.00.96.00Current price is: ₹96.00.

Non-Fiction

Category:

Tila Tila Daar Ughad (तिळा तिळा दार उघड) – Tara Vanarase (तारा वनारसे)

स्थलवर्णन, देशकालपरिस्थितीचे चिकित्सक निवेदन, प्रवासात भेटलेल्या नमुनेदार माणसांचे व्यक्तिचित्रण आणि आपापल्या शैलीचा प्रवासानिमित्त मुक्त आविष्कार, अशी विविध प्रकारची प्रवासवर्णन आपण वाचत आलो. परंतु प्रवासाच्या निमित्ताने आपल्या सर्वस्वाचे दर्शन घडवता येणे ही किमया क्वचितच साध्य होते.

तारा वनारसे यांनी पन्नास वर्षांच्या काळात मोजकेच लिखाण केले आहे. परंतु त्या सर्व लेखनातून जाणवते, लेखिकेची उत्कटतेने भारलेली अभ्यासू वृत्ती; आणि त्याहूनही अधिक तिचे आत्मभान. प्रत्येक अनुभवाशी तादात्म्य पावत त्यांना शब्दरूप देण्याची क्षमता. शार्लट आणि एमिली ब्राँटे या सर्वपरिचित लेखिकांच्या आठवणींनी व्यापलेल्या यॉर्कशायरमधील मूर्सपासून ज्ञानदेवांच्या आळंदीपर्यंत विविध अनुभव ‘तिळा तिळा दार उघड’मध्ये आपल्या भेटीला येतात.

ISBN: 978-81-7185-959-7

Number of pages: 128

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2008