जीएंची पत्रवेळा… – जी. ए. कुलकर्णी

225.00 180.00
Category:

GAenchi Patravela…

जी. ए. कुलकर्णी आणि ग्रेस या उत्तुंग प्रतिभेच्या आणि मनस्वी लेखन करणाऱ्या दोन श्रेष्ठ लेखकांच्या हृद्य पत्रसंवादातला हा जी.एंच्या पत्रांचा संग्रह. जीएंची पत्रवेळा…

आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पत्रे लिहिणे हा जीएंचा छंद होता. या पत्रांचे संग्रह उपलब्ध आहेत. पण त्यांमधल्या पत्रांपेक्षा या पत्रांचे स्वरूप वेगळे आहे. दोन घनिष्ठ मित्रांमधला हा मैत्रीचा संवाद आहे. केवळ ग्रेस यांच्याचसाठी जीएंनी मुद्दाम बाजूला ठेवलेली आणि ग्रेस यांच्यामुळे त्यांची कन्या मिथिला हिच्याही वाट्याला आलेली ही जिव्हाळ्याची वेळा… म्हणूनच जीएंची पत्रवेळा…

कवितेपासून सुरू झालेले हे नाते त्यापलीकडे जाऊन त्यामध्ये मनांचे गुंतणे होते. जीएंनीच एका पत्रात म्हटल्याप्रमाणे हे नाते आयुष्याला सुखवणारे होते. आयुष्यभर टिकणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण करणारी ही जीएंची पत्रवेळा…

ISBN: 978-81-7185-876-7

No. of pages: 130

Year of Publication: 2010