जास्तीचे नाही : विनोदकुमार शुक्ल (अनु. प्रफुल्ल शिलेदार)

160.00

Fiction

Category:

Jastiche Nahi (जास्तीचे नाही) – Vinodkumar Shukla (विनोदकुमार शुक्ल) Ed. Prafulla Shiledar (अनु. प्रफुल्ल शिलेदार)

गेल्या पाच दशकांपासून कवितालेखन करीत असलेले आणि आयुष्याच्या ज्या टप्प्यावर इतर कवी लेखक आपल्या पूर्वपुण्याईवर चरितार्थ करताना आढळतात अशा टप्प्यावर आलेले विनोदकुमार शुक्ल त्यांच्या सर्जनशीलतेने आपल्याला या संग्रहातूनदेखील अवाक् आणि चकीत करतात. भारतीय समाज आणि मानवजातीबद्दलची त्यांची संपूर्ण सहानुभूती, करुणा आणि बांधिलकी येथे निःसंदिग्धपणे दिसून येते.

कोणता माणूस आहे कळणे महत्त्वाचे नसून त्याचे हताश होणे आणि त्याच्यासोबत चालणे या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे फक्त विनोदकुमारच म्हणू शकतात. त्यांनीच प्रयोगशीलता आणि प्रतिबद्धता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. जगण्यातील आणि कविकर्मातील प्रश्नांना आणि जबाबदाऱ्यांना स्वीकारून एकाच वेळी सूक्ष्म आणि विराट, व्यष्टिसन्मुख आणि समष्टीसन्मुख, स्थानिक आणि वैश्विक, भौतिक आणि अधिभौतिक असणारे विनोदकुमार शुक्ल हे हिंदीतील कदाचित सर्वाधिक जागरूक, निर्भीड आणि धीट कवी असल्याचे दिसून येते.

विनोदकुमार शुक्ल यांच्यामधला कवी स्वतःची अकल्पनीय अशी नित्यनूतन रूपे दाखवितो आहे ही गोष्ट या संग्रहातून आश्चर्यकारकरित्या पुढे येते. त्यांचीच प्रतिमा वापरून सांगायचे झाल्यास त्यांची कविता सगळ्यांच्या आवाजाचा कोरस सामावून घेतलेला जलप्रपात आहे. ते निःसंशयपणे आजच्या आमच्या सर्वश्रेष्ठ कवींपैकी एक आहेत.

– विष्णू खरे

ISBN: 978-81-7185-539-1

Number of pages: 124

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2013

 

Weight 0.150 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm