जातक – विंदा करंदीकर

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

Fiction

Category:

Jatak (जातक) : Vinda Karandikar (विंदा करंदीकर)

‘निर्वाणीचे गझल’ मधील नऊ नवीन गझलांसह तिसरी आवृत्ती.

जीवनातल्या विविध कुतूहलांचा जाणीवपूर्वक शोध घेणारी आणि त्यांच्या मुळाशी जाऊन भिडणारी, व्यापक अशा समाजजीवनाशी एकरूप पावलेली आणि समाजमनस्क अशी विंदा करंदीकर यांची कविता आहे.
‘जातक’ हा त्यांचा १९६८ मधील काव्यसंग्रह. तालचित्रे, मुक्त सुनिते, मुक्तछंद अशा सर्व प्रकारच्या कविता यात आलेल्या आहेत. अंत्य, मध्य आणि परार्ध अशा उलट्या क्रमाने विभाग पाडून ‘जातक’ मधल्या कविता करंदीकरांनी लिहिल्या आहेत. यांतील नऊ सुनिते हे संग्रहाचे वेगळेपण! जीवनातील विसंगती आणि विपरीतता या बद्दलच्या कवीच्या जाणिवा त्यांच्या या संग्रहातील कवितेतून अधिक विस्ताराने प्रकट झाल्या आहेत. दुसऱ्या आवृतीत ‘अंत्य’मधील शेवटच्या आठ व ‘मध्य’मधील शेवटच्या सात कवितांचा समावेश केला होता. त्यानंतर आता या तिसऱ्या आवृत्तीत ‘निर्वाणीचे गझल’ मध्ये नऊ नवीन गझलांचा समावेश केला आहे.

ISBN: 978-81-7185-899-6

Number of pages: 136

Language: Marathi

Year of Publication: Reprint 2024

 

Dimensions 21.59 × 13.97 cm