जगाला प्रेम अर्पावे : ना. धो. महानोर

60.00 Original price was: ₹60.00.48.00Current price is: ₹48.00.

Fiction

Category:

Jagala Prem Arpave (जगाला प्रेम अर्पावे) – Na. Dho. Mahanor (ना. धो. महानोर)

‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ म्हणत आपले अवघे आयुष्य इतरांसाठी वेचणाऱ्या सानेगुरुजींची ही काव्यमय ओळख.
कोकणातील रम्य वातावरणातून, उबदार घरट्यातून बाहेर पडून खानदेशातील निराधार, निष्पाप मुलांना मायेचा ओलावा देण्यात सानेगुरुजी यांनी आपले अवघे जीवन वेचले. या समाज कार्याबरोबरच गांधीजींच्या प्रेरणेने स्वातांत्रय लढ्यातही ते सहभागी झाले आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांचे कार्य ‘राष्ट्र् सेवा दल’, ‘साधना’ या रूपाने चालूच राहिले. परंतु स्वातंत्र्योत्तर दंगलींमुळे विव्हल झालेले सानेगुरुजी मनाने व्यथित होत गेले आणि मृत्यूबद्दल त्यांना वाटणारी ओढ अधिकच तीव्र् होत गेली.
सानेगुरुजींच्या एरवी ‘मऊ मेणाहून’ अशा स्वभावातील अन्यायाविरुद्ध लढताना जाणवणारे ‘वज्राहून कठीण’ मनोधैर्य महानोरांनी या कवितांमधून नेमकेपणाने व्यक्त केले आहे.

ISBN: 81-7185-867-8

Number of pages: 62

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2005