गोडवा: शुगर-फ्री गोड पदार्थ : शुभदा गोगटे

135.00 Original price was: ₹135.00.108.00Current price is: ₹108.00.

Non-Fiction

Category:

Godva (गोडवा: शुगर-फ्री गोड पदार्थ) – Shubada Gogte (शुभदा गोगटे)

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये गोड पदार्थांना, पक्वान्नांना एक विशेष स्थान आहे. गोड पदार्थ खाणं, दुसऱ्याला देणं, वाटणं म्हणजेच आपला आनंद साजरा करणं असं आपण समजतो. असं असलं तरी प्रकृतीच्च्या कारणामुळे काहींना साखर, गूळ आहारातून वर्ज्य करावा लागतो. गोड चवीचे पदार्थ खाता येत नाहीत. अशा मंडळींसाठी शुभदा गोगटे यांनी उष्मांक, वजनमापे यांच्या आकडेमोडीत न अडकता कृत्रिम स्वीटनर्स वापरून सुलभ आणि चविष्ट अशा गोड पाककृती ह्या पुस्तकात दिल्या आहेत.

शुभदा गोगटे विज्ञान शाखेच्या पदवीधर असून विज्ञानकथा, गूढकथा, ऐतिहासिक कादंबरी, आरोग्य, पाककला अशा विविध क्षेत्रांत त्यांनी विपुल लेखन केलं आहे. काही खास मराठी अन्नपदार्थ ‘इन्स्टन्ट’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे यशस्वी प्रयोग त्यांनी १९८०च्या दशकात करून ‘सात्त्विक फूड्स’ या नावाने त्यांची निर्मितीही केली होती.

शुभदा गोगटे यांच्या स्वानुभवातून सादर झालेला हा ‘गोडवा’ खाद्यप्रेमी रसिकांसाठी नक्कीच वरदान ठरावा.

ISBN: 978-81-7185-144-7

Number of pages: 132

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2016