गेट वेल सून : प्रशांत दळवी

130.00
Category:

Get Well Soon (गेट वेल सून) – Prashant Dalvi (प्रशांत दळवी)

‘गेट वेल सून’ हे प्रशांत दळवी यांनी लिहिलेलं नाटक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘मुक्तिपत्रे’ या पत्ररूपी पुस्तकाचं उत्तम नाट्यरूपांतर. या नाटकातून व्यसनाचा धोका कुठेही उपदेशाचे डोस न पाजता नाट्यपूर्णरित्या मांडला गेला आहे. एखाद्या थरार नाट्यासारखी संरचना हे या नाटकाचं बलस्थान आहे. पहिल्या अंकाचा अनपेक्षित शेवट आपल्याला नाटकात गुंतवतो. दुसऱ्या भागात होणारी त्याची उकलही तितकीच प्रभावी आहे. एखादी सामाजिक समस्या रंजक गोष्टी सांगून प्रेक्षकांच्या गळी उतरवणं खूप कठीण असतं. पण प्रशांत दळवी यांनी ‘गेट वेल सून’मध्ये हे लिलया साध्य केलं आहे. उत्कृष्ट संवादलेखन हे दळवींच्या लेखनाचं बलस्थान आहे. या नाटकातही आपल्याला याची प्रचीती येते.

हे नाटक पत्रांतून उलगडत जातं. त्यामुळे ते शब्दबंबाळ होण्याची शक्यता होती. पण प्रशांत दळवी यांनी नाटकाची मांडणी अशा पद्धतीने केली आहे की पत्रं आपली उत्सुकता वाढवतात. पत्रांमधून व्यक्तिरेखामधले वैयक्तिक संबंध उलगडत जातातच शिवाय प्रशांत दळवी या पत्रांच्या माध्यमातून वाचाकांशीही जवळीक साधतात आणि व्यक्तिरेखाबद्दल ममत्व निर्माण करतात.

ISBN: 978-81-7185-491-2

No. of pages: 100

Year of publication: 2014

Weight 0.32 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.8 cm