गुणाकार – गंगाधर गाडगीळ

150.00 Original price was: ₹150.00.120.00Current price is: ₹120.00.
Category:

Gunakar – Gangadhar Gadgil

गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका : खंड २

महायुधोत्तर कालखंडातील नव्या साहित्यिक युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होते. कथा या साहित्यप्रकारची संकल्पना ‘नव’विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय निःसंदिग्धपणे त्यांचे आहे.
गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णतेचा तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे.
‘नव्या वाटा’ (१९५०) आणि ‘भिरभिरे’ (१९५०) या गाडगीळांच्या दोन संग्रहांतील कथा ‘गुणाकार’ या प्रस्तुत खंडात संकलित केल्या आहेत. कथानिर्मितीतील नव्या वाटा चोखाळणाऱ्या गाडगीळांच्या प्रतिभेची साथ त्यांतून मिळते. त्यांतील कथावस्तूंतील वैविध्यपूर्णता तर लक्षणीय आहेच, पण या कथांतून ध्वनित होणारी सामाजिक मर्म दृष्टी आणि व्यक्त होणारे मानवी जीवनातील आयरनीचे व्यापक व प्रगल्भ भान यांकडे आवर्जून लक्ष वेधावेसे वाटते.

ISBN: 978-81-7185-626-8

Number of pages: 254

Year of Publication: 1965