Gawachya Akabhowati (गावाच्या आकाभोवती) – Prakash Kingaonkar (प्रकाश किनगावकर)
प्रकाश किनगावकरांची संवेदनशीलता ग्रामीण जीवनातील व्यथा-वेदना- दुःखे यांची अनेकविध रूपे टिपते. कुणब्याच्या भागधेयात असलेले अतीव कष्ट, अभाव; कृषिजीवनाची गेल्या काही वर्षांपासून होत गेलेली पडझड, शेतकऱ्याच्या जगण्याशी बांधलेले ऋतुचक्र आणि त्याच्या साध्यासुध्या अपेक्षांची, स्वप्नांची, निसर्गाने केलेली धूळधाण हे जीवनवास्तव गावजीवनातील असंख्य तपशीलांतून आणि प्रतिमांमधून या कवितेत उभे राहते. खेड्यातील जगण्याच्या अनुभवाचा जिवंत स्पर्श या कवितेला आहे. ग्रामीण स्त्री-पुरुषांच्या दुःखाला उत्कटपणे भिडलेली ही कविता समकालीन काव्यभाषेच्या मोहात न अडकता स्वतःच्या जीवनजाणिवांशी प्रामाणिक राहते आणि पूर्व खानदेशी बोलीतील शब्दांमधून खेड्यातले जीवनवास्तव व्यक्त करते. अतिशय साधी, खरीखुरी असणारी ही कविता काळजाला स्पर्श करते.
प्रभा गणोरकर
ISBN: 81-7185-924-0
Number of pages: 146
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2006