कुंभारवाडी – महाबळेश्वर सैल

275.00 Original price was: ₹275.00.220.00Current price is: ₹220.00.

Fiction

Kumbharwadi (कुंभारवाडी) – Mahabaleshwar Sail (महाबळेश्वर सैल)

‘कुंभारवाडी’ ही महाबळेश्वर सैल यांची सरस्वती सन्मानाने पुरस्कृत झालेली कादंबरी. मूळ कोंकणी भाषेत ‘हावठाण’ या नावाने प्रसिद्ध झालेली ही कादंबरी महाबळेश्वर सैल यांनीच ‘कुंभारवाडी’ या नावाने पुन्हा मराठीत लिहिली.
कादंबरीच्या शीर्षकावरूनच लक्षात येतं की, ही कुंभारांच्या जीवनावरची कादंबरी आहे. गावाच्या माळावरच्या आंब्याच्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत, त्याच्या आधाराने वसलेली कुंभाराची आठनऊ छपरांची लहानशी कुंभारवाडी. आपल्या पिढीजात मातीकामाच्या व्यवसायात रमलेली. अगदी दिवल्या-पणत्यांपासून गाडगी, मडकी, हंडे-रांजण पेटणारी, सणावाराला मातीचे बैल, गणपतीच्या मूर्ती घडवणारी ही कलावंत जमात. शिक्षणाची आस धरून शहरात जाणारा एखादाच सदानंद सोडला तर गावाची वेशी न ओलांडलेले हे कुंभार रूढी परंपरा यांना सोडायला तयार नाहीत. काळाबरोबर येणारे बदल स्वीकारायला धजावत नाहीत. बदलत्या काळाबरोबर उद्ध्वस्त होत गेलेल्या कुंभारवाडीचं चित्रण या कादंबरीत वाचायला मिळतं.
‘कुंभारवाडी’तल्या अनेक व्यक्तिरेखांच्या आयुष्याचं, त्यातल्या सुखदुःखाचं चित्रण करताना, कुंभारांचे पूर्वज, त्यांच्या रूढी-समजुती, चालीरीती, त्यांचे सणवार, त्यांच्या धंद्याच्या पद्धती या सगळ्याचं जिवंत चित्रण महाबळेश्वर सैल यांनी केलं आहे. सैल यांची चित्रदर्शी शैली आणि त्यांनी केलेली वर्णनं अचूक टिपत अन्वर हुसेन यांनी काढलेली सुंदर रेखाचित्रं यामुळे ही कादंबरी अधिकच वाचनीय झाली आहे.

ISBN: 978-81-7991-939-2

Number of pages: 152

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 1st Ed. 2021 & 1st Reprint 2024