करंदीकरांचें समग्र लघुनिबंध : गो. वि. करंदीकर

425.00 Original price was: ₹425.00.340.00Current price is: ₹340.00.
Sold out

Out of stock

Category:

Karandikaranche Samagra Laghunibandha

गो. वि. (विंदा) करंदीकरांच्या लघुनिबंधांचे ‘आकाशाचा अर्थ’ आणि ‘स्पर्शाची पालवी’ असे दोन संग्रह उपलब्ध आहेत. या संग्रहातले सर्व आणि दोन अप्रकाशित लघुनिबंध विजया राजाध्यक्ष यांच्या प्रदीर्घ प्रस्तावनेसह नव्या स्वरूपात ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’ या नावाने प्रकाशित होत आहेत, त्यामागे एक विशिष्ट हेतू आहे.

विजयाबाईंनी आपल्या प्रस्तावनेच्या सुरुवातीसच म्हटल्याप्रमाणे ‘विंदा’ या नावाने त्यांनी लिहिलेल्या कवितेइतकेच गो. वि. करंदीकर या नावाने त्यांनी लिहिलेले लघुनिबंधही महत्त्वाचे आहेत. पण त्यांची घ्यावी तेवढी दखल समीक्षकांनी घेतली नाही. परंतु कवी म्हणून करंदीकरांचा विचार करताना त्यांच्या लघुनिबंधांचा अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते, कारण ते त्यांच्या कवितेशी अधिक संलग्न आहेत, शिवाय दोहोंचा लेखनकाल समांतर आहे. ‘लघुनिबंध’ हा वाङ्मयप्रकार म्हणून अभ्यासण्यासाठीही करंदीकरांच्या लघुनिबंधांचा विचार करता येतो, कारण आज ‘ललितगद्य’ नावाने होणारे लेखन ज्याच्या खांद्यावर उभे आहे तो ‘लघुनिबंध’ हा वाङ्मयप्रकारही हळूहळू इतिहासजमा होऊ लागला आहे. करंदीकर आजही लघुनिबंध लिहीत असते तर गोष्ट वेगळी झाली असती. पण त्यांनी स्वतःचे लघुनिबंधलेखन १९६५ सालीच थांबवले. त्यामुळे त्यांचे विस्मरण होण्याचा संभव वाढला. लघुनिबंधलेखन चालू होते तेव्हाही कविता अग्रभागी व लघुनिबंध पार्श्वभूमीला अशी स्थिती होती. लघुनिबंधलेखन थांबवल्यानंतर काही काळ करंदीकर कविता लिहीत होतेच. त्यामुळेही लघुनिबंध काहीसा मागे पडला. या काही कारणांमुळे करंदीकरांच्या लघुनिबंधांचा सविस्तर अभ्यास करण्याची निकड वाढली.

ISBN: 978-81-7185-682-4

No. of pages: 282

Year of publication: 1996

Weight 0.32 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1.3 cm