Othello
शेक्सपीयरच्या नाटकांची आत्तापर्यंत अनेक प्रकारे भाषांतरे झाली आहेत. बुकीश नाटकाच्या जमान्यात इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासकांनी शेक्सपीयर मराठीतून वाचता यावा म्हणून जवळ जवळ शब्दश: भाषांतरे केली. शेक्सपीयर रंगभूमीवर सादर करायचा तर पार्श्वभूमी देशी हवी या समजुतीने प्रयोगानुकूलतेने त्यात फेरफार करून रंगावृत्त्या झाल्या. त्याही पलीकडे फक्त कथाभाग मुळाबरहुकूम ठेवून संपूर्णपणे मराठी पेहराव चढवून रूपांतरेही झाली आहेत..
शेक्सपीयरच्या नाटकांतील नाट्य जितके महत्त्वाचे त्याहूनही अधिक त्यातील काव्य मनोरम श्रेष्ठ कवी आणि समर्थ नाटककार असलेल्या वि. वा. शिरवाडकरांच्या या रूपांतराचा तो मुख्य गाभाच आहे. नाटककार आणि कवी ही शेक्सपीयरची दोन्ही अंगे आत्मसात करून शिरवाडकरांनी अधिची प्रतिकृती महेश्वर उभी केली आहे. त्यांनी जरी पात्रांची नावे आणि पार्श्वभूमी बदलली असली तरी खऱ्या अर्थाने त्यांनी शेक्सपीयर मराठीत आणला आहे.
या आवृत्तीत नाट्यप्रयोगाविषयी लेखक, प्रकाशक आणि कमी दत्ता भट, नीलम फिलोस्कर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत
ISBN: 978-81-7185-642-8
No. Of Pages: 128
Year Of Publication: 1961