उद्गार : संजय संगवई

150.00

Non-Fiction

Category:

Udgar (उद्गार) – Sanjay Sangawai (संजय संगवई)

नव्या सहस्रकात प्रवेश करताना आजवरच्या भांडवलशाह्या व त्यांचीच उफराटी आवृत्ती करणाऱ्या ‘पर्यायी’ व्यवस्था यांमुळे बेलगाम तंत्रे आणि तंत्र-आर्थिक प्रक्रियांमुळे आपल्या उन्नत व पुरोगामी जाणिवा, आकलनशक्ती, मूल्ये, संघटन व संघर्ष यांना केवढी मोठी भगदाडे पडत आहेत आणि एक सर्वव्यापक विरूपता, एक नवी कार्यक्षम व्यवस्था म्हणून आपल्या बोकांडी बसत आहे याचे भान आलेल्या दुर्मीळ विचारवंत कार्यकत्यांपैकी संगवई हे होते.

‘नव्या’ युगाला सामोरे गेलेच पाहिजे व खऱ्या आधुनिकतेसाठी त्याला पर्याय नाही ही गोष्ट त्यांना मान्यच होती. पण म्हणूनच लोकशाहीवादी, मानवीय मूल्यांना व निष्कर्षांना धरून वस्तुस्थितीला सामोरे जाणे म्हणजे त्याचे मूल्यमापन करणे, त्यासंबंधी मूलभूत वा विरोधी प्रश्न विचारणे किंवा त्याची चिकित्सा करून ते नको असेल तर न स्वीकारणे या गोष्टी कर्तव्य म्हणून बेडरपणे व प्रस्थापित प्रवाहांच्या विरुद्ध दिशेने कराव्याच लागतात हे संगवईंनी मनोमनी जाणले.

सामाजिक-राजकीय परिवर्तनवादी चळवळींनी नव्या बदलांचा माग ठेवूनच निव्वळ विचार, धोरण, उद्दिष्टे व पद्धती यांच्यापुरताच नव्हे तर काही विक्राळ असलेल्या व भस्मासुराप्रमाणे उलटलेल्या आधुनिक गोष्टींचा समकालीन दृष्टीने मूलभूत विचार केला पाहिजे हे त्यांच्या भूमिकेचे आद्य सूत्र राहिले.

– राम बापट

ISBN: 978-81-7185-954-2

Number of pages: 222

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2007