आलबेल – सई परांजपे

99.00 79.00

नाटक

Category:

Aalbel

तीन व्यक्ती एकत्र बंदिस्त, अशा कुठे असू शकतील? तुरुंगात! आपल्याला कदाचित मृत्यूचा घाट उतरावा लागेल याची त्या तिघांना जाणीव आहे, कारण तिथे खुनाच्या आरोपाच्या संबंधात ते कोठडीत दिवस मोजताहेत. हे तिघेही कैदी एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. बाहेरच्या नित्याच्या जगात ते असते, तर चुकूनही एकमेकांच्या संपर्कात आले नसते. पार्श्वभूमी, संस्कार, भाषा, आचार, विचार, नीतीमूल्ये या सगळ्याच बाबींमध्ये त्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जबरदस्तीच्या सहवासामुळे, ते हळूहळू एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांचा आधार ठरतात. विरंगुळा बनतात.

मानवाच्या सुप्त माणुसकीचा वेध घेण्याचा अनोखा प्रयत्न या नाटकात केला आहे.

ISBN: 978-81-7185-420-2

No. Of Pages: 56

Year Of Publication: 2015