अफाट जगायच्या नादात / कुणाल गायकवाड

300.00 Original price was: ₹300.00.250.00Current price is: ₹250.00.

HungRy Up !

Offer end in :

Comming Soon...

Afat Jagaychya Nadat / Kunal Gaikwad अफाट जगायच्या नादात / कुणाल गायकवाड

कुणाल गायकवाड यांच्या कवितेत येणारे रान हे वाऱ्यावर लहरत झुलणारे किंवा हिरव्या नक्षीसारखे आखीव रेखीवही नाही… उजाड सुनसान डोंगरमाथे, ग्रीष्माच्या उन्हात फुलून आलेला पळस, वाळल्या गवताचे कुसळ अशा रखरखीत रानाची ही कविता आहे.

ज्या तफडेने ही कविता सरंजामदारांच्या गढ्या खणू पाहते त्याच निकराने किमान कौशल्याधारित करियरिस्टांच्या कासोट्याला हात घालून प्रतिमावर्धनाची चलाखीही उघडी पाडते. सप्तशतीत गाथा लिहिणाऱ्या बायांपासून ते जिच्या ओटीपोटीत कैक नद्या मावाव्यात अशा भुरकट कुसळाचा रंग असणाऱ्या छोरीपर्यंत असंख्य बायकांची दुनिया या कवितेत आहे. यातल्या रासवट शिनगाराच्या कवितांना झींग आणणारी लय आहे, रक्ताच्या नात्यांवरच्या कवितेत कमालीचे कारूण्य! जिवाचा ‘अजिंठा’ करण्याची चाह बाळगून असलेली ही कविता पोतराजांपासून ते अवलिया पीर, कलंदर कव्वालापर्यंतचा नाद स्वतःत भिनवते. ही कविता पिवळा भंडारा उधळत सुंबरान मांडते, गजीचा ताल धरते, संबळाचा निनाद करते. बिरोबा, खंडोबा यांच्याशी नातं सांगून आपण खुद्द संस्कृती आहोत असा जबर आत्मविश्वास बाळगते. वतन सिद्ध करणाऱ्या इथल्या ‘स्थावर’ आणि ‘जंगम’ गोष्टींना फाट्यावर मारते. म्हणूनच खऱ्या अर्थाने विमुक्त, बेबंद असलेल्या या कवितेला निळाईचे अफाट आकर्षण आहे. आभाळाची ओढ असलेल्या या कवितेचे मनःपूर्वक स्वागत !

– आसाराम लोमटे

 

Weight 0.280 kg
Dimensions 18.5 × 12 × 0.8 cm
ISBN

978-81-685028-8-8

Pages

108

Binding

Hardbound with Jacket

Cover Design

Anwar Husain

Edition

1st Edition August 2026