सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा निग्रह करणाऱ्या पोलीस दलातील एक संवेदनशील चेहरा म्हणजे आयपीएस
गजानन राजमाने. त्यांच्या ‘खांद्यावरचे स्टार्स’ या पुस्तकातून गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन, नक्षलवाद्यांना मुख्य
प्रवाहात आणण्याचे प्रयत्न आणि खाकी वर्दीतील माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन घडते.