Chintamani : Ek Chirantan Chintan (चिंतामणी : एक चिरंतन चिंतन)

2,000.00 Original price was: ₹2,000.00.1,600.00Current price is: ₹1,600.00.

Non-Fiction

Chintamani : Ek Chirantan Chintan  ( चिंतामणी : एक चिरंतन चिंतन ) – Shruti Pandit & Shashi Vyas ( श्रुती पंडित आणि शशी व्यास )

कला ही गोष्ट मुळी कष्टसाध्यच! त्यातून संगीत हा तर महासागर आहे. सी. आर. व्यास यांची गानतपस्या, त्यामागचा संघर्ष लहानपणीच सुरू झाला. त्यांच्यावरील बालपणातले संस्कार, संगीतकार होण्याचा मनस्वी ध्यास, त्यासाठी परिश्रम घेऊन साधना करण्याची तयारी, पराडकरबुवांची तालीम आणि जगन्नाथबुवांची केलेली आराधना, भारतीय संगीत शिक्षापीठ आणि वल्लभ संगीतालय या संस्थांत शिक्षण देत असताना त्यांच्यावर झालेले भातखंडे परंपरेचे संस्कार हे वाचताना चिंतामणी, सीआर ते व्यासबुवा – हे त्यांच्यातील परिवर्तन भारावून टाकणारे आहे.
गुरुबिन ग्यान प्राणबिन तनसों नित सुमिर
‘जानगुनी’ राजाराम ||
ज्येष्ठ प्रकाशक आणि रागदारी संगीताची उत्तम जाण असलेले रामदास भटकळ यांचे संपादन आणि लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांची सविस्तर प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे. व्यासबुवांविषयीच्या सांगीतिक आठवणी विशद करताना त्यासोबतच त्यांच्या विविध बंदिश-रचनांचे, ख्यालगायनाचे QR कोड दिलेले आहेत. जेणेकरून हे पुस्तक वाचताना शब्दांसोबतच सुरांचाही श्रवणीय आनंद वाचकांना घेता येईल. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांची नेत्रसुखद मांडणी आणि उत्तम निर्मितीमूल्य असलेलं हे संग्राह्य पुस्तक आहे.

ISBN: 978-81-969198-7-0

Number of pages: 340

Language: Marathi

Cover: Hardbound With Jacket

Year of Publication: 2024