प्रेम आणि खूप खूप नंतर : श्याम मनोहर

475.00

Fiction

Prem Ani Khoop Khoop Nantar (प्रेम आणि खूप खूप नंतर) – Shyam Manohar (श्याम मनोहर)

तरुण नरेंद्र आणि तरुण दीपिका प्रेमात पडतात. नरेंद्र दीपिकाच्या अनवट प्रेमाने मोहित असतो आणि त्याला मधूनमधून प्रेमात दीपिकाच व्हिलन वाटते. दोघांचे लग्न होते. “आपल्यासारखा मधुचंद्र सर्व तरुण-तरुणींचा व्हायला हवा. आपण तरुण-तरुणींची मधुचंद्रासंदर्भात शिबिरे घ्यायला हवीत,” असे नरेंद्र म्हणतो. खूप खूप नंतर : तृप्त जीवन जगलेले नरेंद्रजी आणि दीपिकाजी… नरेंद्र आणि दीपिकाजी दुसरा मधुचंद्र साजरा करतात. परिस्थिती असे वळण घेते की नरेंद्रजी दीपिकाजींवर गोळी झाडतात… तरुणपणापासून दीपिकाजी शोधत असतात. अखेरीस त्यांना ते सापडतेही.
श्याम मनोहरांची अशी ठाम धारणा आहे की, सद्यःकालीन व्यापक सामाजिक स्थितिप्रियतेच्या मुळाशी माध्यम वर्गाची बुद्धिविरोधी वृत्ती आहे. आमच्या समाजजीवनाला वैज्ञानिक पाया नाही. आम्हाला ज्ञानप्राप्तीची खरी ओढच नाही. माहितीच्या क्रांतीत मग्न असलेला आजचा समाज ज्ञानसमाजाच्या आदर्शापासून दुरावत चालला आहे. आम्ही कोरडे विचार खूप गिरवले, तत्त्ववैचारिक उसनवारीही उदंड केली; पण ज्ञान संपादन करून सुधारणा किंवा चळवळी केल्या नाहीत… श्याम मनोहरांच्या साहित्याचे पडसाद दीर्घ काळ उठत राहणे अटळ आहे. ज्याला या समाजाचे, संस्कृतीचे आणि सभ्यतेचे गतिशास्त्र समजून घ्यायचं असेल त्याला, तसेच ज्यांचं मानवी प्रश्नांच्या ‘रेडिमेड’ उत्तरांनी समाधान होणार नसेल त्यालाही श्याम मनोहरांचं साहित्य नीट अभ्यासण्यावाचून गत्यंतर नाही. त्यांच्याइतका समकालीन आणि प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेतून निवडलेल्या प्रसंगांद्वारे आपल्या लेखनातून तत्त्ववैचारिकतेचं ओतप्रोत माप वाचकांच्या पदरात घालणारा दुसरा लेखक आजतरी नाही.

ISBN: 978-81-7991-917-0

Number of pages: 290

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: Reprint 2024

Weight 0.252 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm