Toortas… (तूर्तास…) – Dasu Vaidya (दासू वैद्य)
दासू वैद्यांची प्रतिभा निसर्गापेक्षा मानवी जीवनात अधिक रमते. मानवी जीवनातील अंतर्गत विरोधांचा ती आवर्जून वेध घेते. माणसाचे प्रत्यक्ष वर्तमान आणि त्याचे अपेक्षित, श्रेयस्कर रूप यांतील विसंगती आणि विरोध टिपण्यात त्यांची प्रतिभा विशेष रस घेते. त्यांच्या या प्रातिभिक धर्मामुळे त्यांच्या भाषेला आणि प्रतिमासृष्टीला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. माणसांच्या कृती आणि वर्तन यांतून त्यांची प्रतिमासृष्टी घडली आहे. तसेच मानवी व्यवहारांतील विरोधांची अर्थपूर्णता शोधणारी त्यांची भाषा व्यावहारिक बोलभाषेचा अवलंब आपल्या अभिव्यक्तीसाठी करते. भाषेची प्रस्थापित काव्यात्म रूपे आणि अलंकरण यांपासून दासू वैद्यांची कविता कटाक्षाने दूर राहते. आपल्या भावनिक प्रतिक्रियांचे कथन करण्याऐवजी मानवी वास्तवाच्या अलिप्त, कोरड्या आणि क्वचित मिस्कील कथनातून ते आपल्या क्षुब्ध आणि तीव्र भावना व्यंजित करतात. विरोधान्यास आणि विपरीतताभाव यांच्या उपयोजनेतून ही व्यंजना सिद्ध होते. दासू वैद्यांची ही कविता समकालीन असूनही ती समकालीन काव्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे.
– सुधीर रसाळ
ISBN: 978-81-7185-930-6
No. of pages: 152
Year of publication: 2003