Marathi Natak Ani Rangabhumi : Visave Shatak
नाट्यप्रयोगात शब्द, आवाज, मुद्राभिनय, हावभाव, शारीरिक हालचाली, रंगभूषा, शिरोवेष, वेषभूषा, आवश्यक वस्तू, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यांचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो. नाटकाच्या संहितेत वरील गोष्टीची नोंद केलेली असते. मूळ संहिताकाराने तपशिलासह सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या नसल्या तर नाटकाचा दिग्दर्शक, नेपथ्यकार प्रकाशयोजक, नट अशी भर घालतात. तेव्हा नाट्यप्रयोगासाठी संहिता सिद्ध होते. ही संहिता म्हणजे नाट्यप्रयोग नव्हे. संहिता स्थापत्यविशारदाने काढलेल्या नकाशासारखी असते. ही संहिता अपूर्णच असते. नाट्यप्रयोगात ती पूर्ण होते.
नाट्यसंहितेचा साहित्य म्हणूनही आपण विचार करतो. तो वाचायची गोष्ट असते, जशी कविता, कथा वा कादंबरी. तिचे वाङ्मयीन मूल्यामापन केले जाते. कथानक, पात्रपरिपोष, संवाद, नाटकाचे सूत्र, लेखकाचे तत्त्वज्ञान या गोष्टी पाहिल्या जातात. ही संहिताही अपूर्णच असते. रंगमंचाचा संदर्भ जागवत आकारास आलेली ती वाङ्मयीन संहिता असते. एक वाङ्मयीन कृती म्हणून तिचा आस्वाद आपण घेत असलो तरी ती रंगमंचावरील प्रयोगासाठी आहे याचे भान आपल्याला असते.
ISBN: 978-81-7991-981-1
No. Of Pages: 415
Year Of Publication: 2019