Askidil
विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य मराठी भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे या साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतींचा समाजाचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे साहित्य मराठीत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या अनेक समकालीन लेखकांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्या कादंबर्यांपैकी ही एक कादंबरी. सुप्रसिद्ध तुर्की लेखिका गुल इरेपोलू यांच्या ‘कॉन्क्युबाईन’ या ऐतिहासिक कादंबरीतून इस्तंबूलचे वैभवशाली वातावरण वाचकाला अबुधावास येते.
‘अस्किदिल’ कादंबरीची नायिका अस्किदिल नावाची भोगदासी. आणि कादंबरीचा काळ आहे अठराव्या शतकातील सुलतान अब्दुल हमीद, पहिला याच्या राजवटीचा. सुलतान, त्याच्या जनानखान्यातील अस्किदिल नावाची सुंदर दासी आणि जनानखान्यातील मुख्य खोजा काफूर या तिघांच्या कथनातून कादंबरी उलगडत जाते. सुलतानाच्या अनेक स्त्रियांपैकी एक अस्किदिल सुलतानाच्या प्रेमात पडते, परंतु तिच्या प्रेमाला सुलतान तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद देऊ शकत नाही. जनानखान्यातील खोजा काफूर हाही मनातल्या मनात अस्किदिलवर प्रेम करत असतो. या प्रेमकथेचा भोवतीनेच तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि सामाजिक समस्या यांचेही अतिशय प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत येते. ऑटोमन साम्राज्याच्या वैभवाचे भरजरी वर्णन आणि वेगळे रचनातंत्र ही या कादंबरीची खास वैशिष्ट्ये आहेत.
ISBN: 978-81-7991-989-7
No. of Pages: 236
Year of Publication: 2019