रांगोळीचे ठिपके : वासंती गाडगीळ
Non-Fiction
काजवा : गंगाधर गाडगीळ
Kajwa (काजवा) – Gangadhar Gadgil (गंगाधर गाडगीळ) गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका : खंड ९ महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाड्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना ‘नव’ विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय निःसंदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त...
कबुतरे : गंगाधर गाडगीळ
Kabutare – Gangadhar Gadgil कबुतरे’ हे १९५२ साली प्रसिद्ध झालेले ‘पॉप्युलर प्रकाशना’चे पहिले पुस्तक. गंगाधर गाडगीळांसारख्या मातब्बर लेखकाच्या कथासंग्रहापासून पॉप्युलर प्रकाशनाची सुरुवात झाली. मानवी मनोव्यापार, त्याचे सूक्ष्म विश्लेषण हे गाडगीळांच्या कथेचे केंद्र आहे आणि त्यातून जाणवणाऱ्या जीवनविषयक चिंतनामुळे गाडगीळांच्या कथेला एक वेगळेच परिमाण येते. या संग्रहातील ‘कबुतरे’, ‘बिनचेहऱ्याची संध्याकाळ’, ‘मृत्यूचे...
लिलीचे फूल : गंगाधर गाडगीळ
लिलीचे फूल Liliche Phool – Gangadhar Gadgil एखाद्या यक्षभूमीसारख्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी ही कादंबरी घडते. कादंबरीची नायिका नीला बालकवींच्या फुलराणीसारखी नाजूक, निरागस आणि सुंदर आहे एखाद्या परीकथेतल्या राजकन्येसारखी. ही कादंबरी वर वर पाहता वास्तवाच्या, नित्य व्यवहाराच्या पातळीवर घडते; पण खरं म्हणजे ती एखाद्या दुःस्वप्नासारखी, नाइटमेअरसारखी आहे. ती परीकथेसारखी आहे आणि...
गुणाकार : गंगाधर गाडगीळ
Gunakar – Gangadhar Gadgil गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका : खंड २ महायुधोत्तर कालखंडातील नव्या साहित्यिक युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होते. कथा या साहित्यप्रकारची संकल्पना ‘नव’विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय निःसंदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णतेचा...
खर सांगायच म्हणजे… : गंगाधर गाडगीळ
Khara Sangaycha Mhanje… – Gangadhar Gadgil विनोदबुद्धी हे गाडगीळांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे एक आकर्षक अंग. त्यांच्या गंभीर कथा वाचतांनादेखील विनोदाचे प्रसन्न शिडकावे अंगावर उडत असतात. ‘खरं सांगायचं म्हणजे…’ या संग्रहात त्यांच्या उत्कृष्ट विनोदी कथा एकत्र वाचायला मिळतील. गाडगीळांच्या इतर लिखाणाप्रमाणेच त्यांचा विनोद देखील स्वतंत्र प्रकृतीचा आहे. सामाजिक टीकेचे अस्तरही त्यांच्या विनोदाला...
पाळणा : गंगाधर गाडगीळ
Palana – Gangadhar Gadgil गाडगीळांच्या प्रत्येक कथेत आकार घेणाऱ्या पात्र प्रसंगांनुसार त्यांच्या निवेदनाचे तंत्र आणि निवेदकांचा दृष्टिकोन बदलत जातो. कधी त्रयस्थ, सर्वज्ञ भूमिकेचा निवेदक सम्यक जाणीवपूर्वक कथानकांचे पदर उलगडतो तर कधी प्रथमपुरुषी ‘मी’ कधी काव्यात्म, कधी चिंतनशील किंवा विक्षिप्त, विलक्षण तऱ्हेने अंतर्यामीची गूढं उलगडतो; तर कधी हा ‘मी’ स्त्री निवेदिकादेखील...
सोनेरी कवडसे : गंगाधर गाडगीळ
Soneri Kavadase – Gangadhar Gadgil असं आणि तसं ‘ (१९८३) आणि ‘सोनेरी कवडसे’ (१९८६) या दोन संग्रहातील कथा प्रस्तुत खंडात संकलित केल्या आहेत. गाडगीळांच्या कथांतील विविधता आणि अनुभवांचा एक साचा मोडून त्याचे वेगवेगळे साचे तयार करण्याचे त्यांच्या व्यक्तित्वातील प्रायोगिक साहस आणि कमालीची बेचैनी थक्क करणारी आहे.. त्यांच्या कथांत सूक्ष्म मनोविश्लेषण...
उद्ध्वस्त विश्व : गंगाधर गाडगीळ
Udhavastha Vishwa – Gangadhar Gadgil उद्ध्वस्त विश्व’ हा कथासंग्रह प्रथम १९८२ साली प्रकाशित झाला. आधीच्या आवृत्तीनुसार ‘संसार’ या कथेसह ‘नवा अंकुर’ ही कथाही आता नव्या आवृत्तीत समाविष्ट केली आहे. एखाद्या कथेत कधी स्त्री केंद्रस्थानी असते तर दुसऱ्या एखाद्या कथेत पुरुष केंद्रस्थानी असतो. मात्र गाडगीळ आपल्या कथेत स्त्री आणि पुरुष दोघांनाही...
वर्षा : गंगाधर गाडगीळ
Varsha (वर्षा) – Gangadhar Gadgil (गंगाधर गाडगीळ) गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका : खंड ७ वर्षा महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाड्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना ‘नवविणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि:संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली....