You are here: मुख्यपृष्ठ » लेखक » वि. वा. शिरवाडकर

लेखक

वि. वा. शिरवाडकर

 वि. वा. शिरवाडकरांनी काव्य आणि नाटयलेखन केले. काव्यलेखन करताना ‘कुसुमाग्रज’ या नावाने लेखन केले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला. शालेय जीवनातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. सुरूवातीच्या काळात त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले, त्यानंतर काही काळ वृत्तपत्रांतही काम केले.

त्यांच्या लेखनातील काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे ‘विशाखा’, ‘मारवा’, ‘कालिदासाचे मेघदूत’, ‘पाथेय’, ‘महावृक्ष’, ‘मुक्तायन’ हे त्यांचे कवितासंग्रह, तसेच त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये ‘ययाती आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’ विशेष लोकप्रिय झाली, ती पॉप्युलरने प्रकाशित केली. १९८८ साली शिरवाडकरांना ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक देऊन त्यांच्या वाड्‌.मयीन कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, समाजाभिमुखता आणि राष्ट्रीयता ही शिरवाडकरांच्या लेखनाची वैशिष्टये.

Books by वि. वा. शिरवाडकर See More

Mahant
Pravasi Pakshi
Mukhyamantri
Chandra Jithe Ugavat Nahi
 वि. वा. शिरवाडकर
in focus

Wishlist

back to top