You are here: मुख्यपृष्ठ » लेखक » सौमित्र

लेखक

सौमित्र

 सौमित्र म्हणजेच किशोर कदम हे मुख्यत: कवी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी चार एकांकिका लिहिल्या आहेत, ‘गारवा’, ‘सांज होता सखे’, ‘दिस नकळत जाई‘ आणि ‘सांजगारवा’ या त्यांच्या ध्वनिफिती प्रसिध्द आहेत. अनेक  मालिकांची शीर्षक गीते त्यांनी लिहिली आहेत, चित्रपटांची गीते लिहिली आहेत, पंचवीसहून अधिक  हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला आहे आणि १९९५ पासून सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. 
         कधी भास-आभास, तर कधी संपूर्ण वास्तव, कधी कल्पनेतलं धूसर जग तर कधी कठोर अनुभवाची दु:खद पातळी घेऊन येणारी सौमित्रची कविता एका अफाट दु:खाचे ओझे पाठीवर घेऊन उभी आहे असे वाटते. जीवन हे अपूर्ण आहे, दु:खाने निराशेने व्यापलेले आहे, तरीही त्यात कविता आहे याची सौमित्रला अपूर्वाई आहे हे त्यांच्या कविता सांगतात. त्यांच्या कवितेची अभिव्यक्ती, आकृतीबंध आणि तिचा अंतरात्मा हा संपूर्णत: सौमित्र यांच्याच आजच्या वेगळया प्रतिभेतून घडत गेला आहे. 

Books by सौमित्र

..आणि तरीही मी!
 वि. वा. शिरवाडकर
in focus

Wishlist

back to top