तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »पाणी, चारू आरो इत्यादी...

पाणी, चारू आरो इत्यादी...

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :


या पुस्तकात एकूण दोन नाटके आहेत. 'चारु- आरो' या नाटकात लग्नाचे बंधन टाळून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची तयारी असणारे एक प्रेमिकांचे जोडपे, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते,संवाद आहे. प्रस्तुत जोडप्यात आता काही कारणाने दुरावा निर्माण होत आहे. हा दुरावा दोन व्यक्तींच्या जगण्यामागील धारणा भिन्न असण्यातून होत जातो. दोन व्यक्तींमधले संबंध आणि सामाजिक बाबी या दोन्हींमधले अनेक प्रकारचे ताण धर्मकीर्ती यातून उलगडत जातात.
          'पाणी' हे जास्त विचारप्रवृत्त करणारे नाटक आहे . सद्यस्थितीतील निरनिराळ्या सामाजिक -राजकीय चळवळींमधील काही प्रश्नांना लेखक अगदी सरळसरळ भिडतो . साधक- बाधक विचार करुन , प्रसंगी आत्मटीकाही करणारा बुद्धिवादी लेखक आणि प्रत्यक्ष चळवळीचे प्रश्न , लढ्यातील व्यूहरचना यांचा विचार करणारा अस्सल कार्यकर्ता या दोघांतील निर्माण होणारा तणाव हा नाटकाचा मुख्य  विषय . हा विषय धर्मकीर्ती सुमंत वयापलीकडे जाणार्‍या प्रगल्भतेने हाताळतात .
धर्मकीर्ति सुमंत यांच्या या पुस्तकाला २०१२ या वर्षीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला आहे

Save

धर्मकीर्ती सुमंत यांची इतर पुस्तके

गेली एकवीस वर्षे

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-702-9

स्वरूप :

Hard Cover

किंमत :

`55

Buy Now

धर्मकीर्ती सुमंत

नव्या पिढीच्या विचारांना, त्यांच्या मनातील आंदोलनांना मोकळी वाट मिळवून देणारा पॉप्युलर परिवारातील सर्वांत तरुण लेखक म्हणजे धर्मकीर्ती सुमंत.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top