तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »काजळमाया

काजळमाया

Rated 4.5/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

‘काजळमाया’ या कथासंग्रहातील चौदा कथांमधून जी. ए. कुलकर्णी यांचे मानवी विश्र्वासंबंधीचे आणि जीवनासंबंधीचे आकलन प्रभावीपणे व्यक्त होते. या कथांमधून विविध स्वभावांची, प्रकृतीची, परिस्थितीला वेगवेगळया तर्‍हेने सामोरी जाणारी असंख्य माणसे उभी राहतात. माणसांमध्ये असणारी हळुवार माया, भयानक  क्रौर्य, आसक्ती, लालसा, व्देष, मत्सर, सूड, पैशांचा लोभ, लबाडी आणि माणसांच्या वाटयाला येणारी विविध प्रकारची दु:खे, वंचना, फसवणूक, शारीरिक  पीडा, प्रियजनांच्या मृत्यूने होणारी भ्रमिष्टावस्था, माणसांची जिद्द आणि वाटयाला आलेल्या थिटया जगण्यातही कोठेतरी संवेदना शाबूत ठेवण्याची धडपड अशा अनेक  प्रवृत्तींची चित्रे जी. ए. या कथांमधून दाखवतात. 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-991-7

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`275

Buy Now

जी. ए. कुलकर्णी

मुख्यत: ‘कथाकार’ म्हणूनच ओळखले जाणारे जी. ए. कुलकर्णी हे धारवाडच्या जनता महाविदयालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top